कळंब – डॉ.चंद्रशेखर हिवरे यांची उस्मानिया विद्यापीठाच्या पदवित्तर प्राणी शास्त्राच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रा.डॉ.चंद्रशेखर हिवरे हे यापूर्वी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभाग प्रमुख होते. डॉ.हिवरे यांना उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद यांच्याकडून दोन वर्षासाठी विषय तज्ञ म्हणून अभ्यास मंडळावर घेतल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे.या पूर्वी डॉ.हिवरे यांनी माजी वरिष्ठ प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख लोकपाल म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या रेशीम उद्योगाचे संचालक म्हणूनही तीन वर्षे जबाबदारी सांभाळली होती. डॉ.हिवरे यांनी बावीस विद्यार्थ्यांना पदवी प्रधानासाठी मार्गदर्शन केले आहे.त्यांनी आतापर्यंत १५३ शोधनिबंध लिहिले आहेत.त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक (दादा ) मोहेकर यांच्यासह सर्वांनी अभिनंदन करून कौतुक केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड