मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा येथे शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांनी भूषविले. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत सहशिक्षक शैलेश गुरव यांनी स्कॉलरशिप,नवोदय,एनएमएमएस इत्यादी स्पर्धा परीक्षांविषयी पालकांना मार्गदर्शन केले व विद्यालयाच्या मार्गदर्शन वर्गाविषयी माहिती दिली. इंग्रजी विषयाचे सहशिक्षक जोतिराम सोनके यांनी इंग्रजी विषयाचे जागतिक महत्त्व स्पष्ट करत विद्यालयात इंग्रजीसाठी राबविल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती दिली.सहशिक्षिका श्रीमती नीता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत पालकांची भूमिका अधोरेखित करून वाचन-लेखन सुधारण्यासाठी विद्यालयाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा आढावा सादर केला. यावेळी काही पालकांनीही मनोगत व्यक्त केले.प्राचार्य अविनाश मोरे यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तसेच आगामी परीक्षांचे नियोजन,तयारीची दिशा आणि शिक्षकांकडून घेतले जाणारे उपक्रम स्पष्ट केले.पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक जनार्दन भामरे यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,सहशिक्षक जनार्दन भामरे,शैलेश गुरव, जोतिराम सोनके,अशोक राऊत, सहशिक्षिका श्रीमती नीता सोनवणे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन