March 30, 2026

संपादकावरील अन्याय अत्याचारा विरोधात लढणारी देशपातळीवरील संघटना – सुभाष घोडके

  • कळंब (महेश फाटक यांजकडून ) – ऑल इंडिया संपादक संघ ही संपादकावरील होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात लढणारी देशपातळीवरील एकमेव संघटना असून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेची कास धरून चालणारी असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया संपादक संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी सत्कारास उत्तर देतानी केले.
    ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक डि.के. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली साक्षी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता संपादक सुभाष द. घोडके यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
    यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ,स्वराज इंडियाचे तालुकाध्यक्ष अंगद टेकाळे,शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत, पत्रकार राजेंद्र बारगुले, परमेश्वर खडबडे,संघर्ष घोडके आदींनी मनोगतपर शुभेच्छा व्यक्त केल्या.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार प्रा.अविनाश घोडके यांनी मानले.

error: Content is protected !!