कळंब – शिक्षण महर्षी मोहेकर महाविद्यालय,रा.गे.गुरुवर्य शिंदे महाविद्यालय,परंडा आणि सॉफ्ट टेक सोलुशन्स,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. ग्रंथालय शास्त्राच्या “ज्ञानाचे संरक्षण : ग्रंथालयात डिजिटल संग्रहण” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर आणि संजय निंबाळकर,सचिव जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या मार्गदर्शनातून आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि अभ्यासक उपस्थित राहणार असून त्यात काही अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. तसेच यानिमित्ताने कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथपाल -२०२५ आणि सर्वोत्कृष्ट संशोधक ग्रंथपाल पुरस्कार-२०२५ दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. अनुक्रमे स्मृतिचिन्ह,प्रशस्ती पत्र आणि रोख पाच हजार/ तीन हजार रुपयांची पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व वाचक,विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव,ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक, सहायक ग्रंथपाल,अरविंद शिंदे, प्रा.डॉ.राहुल देशमुख आणि चर्चासत्र संयोजन समितीने केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले
कळंब–लातूर रस्त्यावर अपूर्ण कामांचा मृत्यूमार्ग;शिवसेना व व्यापारी संघटनांचा तीव्र आंदोलनाचा इशारा