August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 317 कारवाया करुन 2,61,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-महादेव चंद्रकांत गडकर, वय 68 वर्षे, रा.वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.03.08.2025 रोजी 11.30 वा. सु बोरी गावा जवळील पटेल हॉटेलच्या शेजारी आपल्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 660 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-छाया गोपीनाथ कांबळे, वय 75 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.03.08.2025 रोजी 17.25 वा. सु आपल्या राहते घरासमोर अंदाजे 1,500 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 19 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.आरोपी नामे-सुभाष संभाजी सगट, वय 46 वर्षे, रा. बारुळ ता तुळजापूर जि. धाराशिव हे दि.03.08.2025 रोजी 18.00 वा. सु आपल्या राहते घरासमोर अंदाजे 1,500 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-जयराम रामचंद्र बुरा, वय 82 वर्षे, रा. चिंचोली ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.03.08.2025 रोजी 19.00 वा. सु आपल्या राहते घरासमोर अंदाजे 1,900 ₹ किंमतीची 19 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
  • कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे-राम बाबासाहेब कसबे, वय 24 वर्षे, रा.शेळका धानोरा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.03.08.2025 रोजी 17.10 वा. सु कळंब ते मोहा जाणारे रोडलगत हॉटेल येडेश्वरी चे बाजूला अंदाजे 1,115 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सुजित हसन कुमार, वय 19 वर्षे, रा.कबरा ता. सिंधौली जि. सोतापूर राज्य युपी ह.मु. शेळका धानोरा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.03.08.2025 रोजी 18.00 वा. सु कळंब ते मोहा जाणारे रोडलगत हॉटेल तुळजाई चे बाजूस अंदाजे 1,060₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
  • लोहारा पोलीस ठाणे :लोहारा पो.ठा.चे पथक दि. 02.08.2025 रोजी 23.30 वा. सु. लोहारा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास पतंगे हॉस्पीटल जेवळी बिट भागात चिरकापाटी येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एक इसम दिसून आल्याने पथकास त्याचा संशय आल्याने पथकाने त्यास हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- विक्रम लालु जाधव, वय 40 वर्षे, रा. आनंदवाडी तांडा ता.निलंगा जि. लातुर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नितीन मधुकर माने, वय 32 वर्षे, रा. बिजनवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हा.मु.परपळे वस्ती देखराई फुरसुंगी माता मंदीराजवळ पुणे यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची सी.बी. युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच25 ए.पी.1365 ही दि.02.08.2025 रोजी 07.15ते 08.15 वा. सु.तुळजापूर ते नळदुर्ग रोडवर बारुळ पाटीचे अलिकडे तिर्थ बुद्रुक शिवारातुन अज्ञात व्यक्तीने बॅग कापून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन माने यांनी दि.03.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-रोनीकेत उर्फ स्वप्नील बाबासाहेब राउत, रा. भिमनगर धाराशिव इतर एक इसम ता.जि. धाराशिव यांनी दि.02.08.2025 रोजी 21.00ते 22.45 वा. सु.सरकारी दवाखान धराशिव येथे फिर्यादी नामे-हिमांशु सत्यनारायण व्यास, वय 26 वर्षे, रा.कबुतरों का चौक, नथाथों की गली, जोधपुर राजस्थान ह.मु. बॅक कॉलनी विठ्ठल रुक्मीणी मंदीराजवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गाडीस कट का मारला या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हिमांशु व्यास यांनी दि.03.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव शहर येथे भा.न्या.सं.कलम 109, 121(1),132, 352, 351(2), 3(5) सह भा.ह.का. कलम 4,25 सह म.वै.सेवा व्यक्ती व संस्था संरक्षण अधि 2010 कलम 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-लखन गोविंद चव्हाण, दिपाली लखन चव्हाण, रा. अचलेर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.02.08.2025 रोजी 18.00वा. सु.अचलेर तांडा येथे फिर्यादी नामे-रेणुका राजेंद्र पवार, वय 35 वर्षे, रा.अचलेर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांचे पती व मुलगा यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेणुका पवार यांनी दि.03.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे मुरुम येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दत्ता भास्कर जाधवर, सुरेखा दत्ता जाधवर, कृष्णा दत्ता जाधवर, शिवकन्या दत्ता जाधवर, सर्व रा. इसरुप ता. वाशी, बबन चिंतामनी मुंडे,अशोक चिंतामनी मुडे,अन्नपुर्णा चिंतामणी मुंडे,तिघे रा. भोगजी ता.कळंब जि. धाराशिव, नवनाथ काशीनाथ बोंदर रा. उत्तमी कायापुर ता. जि. धाराशिव यांनी दि.14.07.2025 रोजी 08.00वा. सु.ईसरुप येथे फिर्यादी नामे-प्रभावती बप्पासाहेब जाधवर, वय 40 वर्षे, रा. ईसरुप ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,कुह्राडीचे तुब्यांने मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रभावती जाधवर यांनी दि.03.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),351(2), (3) 352, 189(2), 191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-योगेश विनायक बारकुल, बाळु व्यंकट शिंदे, दोघे रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.03.08.2025 रोजी 17.00वा. सु.आप्पा इडली सेंटर शिवाजी चौक सास्तुर येथे फिर्यादी नामे-शरण श्रीशैल्य नरुणे, वय 26 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील उदारी देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा भाउ गुरसिध्द यास शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरण नरुणे यांनी दि.03.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे लोहारा येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),351(2), (3) 352, 324(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: मयत नामे-महादेव गिरमल मुळे, वय 50 रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.23.07.2025 रोजी 12.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 ई.एच. 3641 ईटकळ येथुन ईटकळ ते अक्कलकोट रस्त्याने जात होते. दरम्यान ईटकळ ते अक्कलकोट रस्त्यावर अनिल गोरड यांचे शेताजवळ निलेगाव शिवारात टॅम्पो क्र एमएच 12 क्यु डब्ल्यु 8583 चा चालक आरोपी नामे- रेहान रुक्मीद्दीन सय्यद रा. सोलापूर यांनी त्याचे ताब्यातील टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून महादेव मुळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात महादेव मुळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर नमुद आरोपी हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता निघून गेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागनाथ महादेव मुळे, वय 23 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह 184, 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “- उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी कदेर येथील जुगार अड्डा व अवैध दारू विक्री करण्यावर छापा मारून केली कारवाई, कदेर व सेवानगर तांडा कदेर येथील दारूबंदीसाठी पुढाकार घेवुन तीव्र आंदोलन छेडण्याच्या ईशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते / निवेदनकर्तेच निवेदन देवुन 12 तासाचे आतच अवैधरित्या जुगार खेळताना अडकले पोलीसांच्या जाळयात.”
  • मौजे कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालु असणारे अवैध दारू विक्री, जुगार धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कदेर ग्रामस्थांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण, आकाश राठोड, शरद आडे, सुमित चव्हाण, सचिन चव्हाण व तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी दि. 02/08/2025 रोजी सकाळी 11:00 वा. चे सुमारास कर व सेवानगर तांडयातील महिला व पुरूष यांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस ठाणे उमरगा येथे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांचे कार्यालयात दिले होते.
  • त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. 02/08/2025 रोजी संध्याकाळी अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी अवैध धंदयाची माहिती काढत पेट्रोलिंग करत कर मोड येथे आले असता पो.नि. अश्विनी भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सेवानगर तांडा येथे वसंत गोपा राठोड, शिवाजी चंदु राठोड हे त्यांचे घरासमोर अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारू विकत असल्याची तसेच सेवानगर तांडा कर येथे गुलाब चव्हाण यांचे घरासमोर 8 जण मिळुन तिर्रट जुगार खेळत आहेत तसेच कदेर शिवारात लक्ष्मी मंदिर समोरील मोकळया जागेत 6 जण मिळुन तिर्रट पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पो. नि. अश्विनी भोसले व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सेवानगर तांडा येथे जावुन वसंत गोपा राठोड याचेवर छापा मारून त्याचे ताब्यातुन 6500 रू. किमतीचे 65 लीटर गावठी हातभट्टी दारू व शिवाजी चंदु राठोड याचेवर छापा मारून त्याचे कब्जातुन 7000 रू. किमतीचे 70 लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून त्यांचेविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल केला. तसेच सेवानगर तांडा कदेर येथील गुलाब चव्हाण यांचे घरासमोर छापा मारून तिर्रट जुगार खेळणारे 1 ) रोहित राजेंद्र चव्हाण रा. कदेर तांडा, 2) आकाश दिलीप राठोड रा.कदेर तांडा, 3) अशोक निळकंठ पवार रा. औराद तांडा, 4) गुलाब भिल्लु चव्हाण रा. कदेर तांडा, 5) अनिकेत भगवान राठोड रा. कदेर, 6) कमलाकर हिरा जाधव रा. अंबरनगर मुरूम, 7) अजय विठ्ठल पवार रा. औराद तांडा, 8) जयसिंग लालु राठोड रा. कदेर तांडा यांचे ताब्यातुन रोख रक्कम, 07 मोबाईल, कार क्र. MH-25BA-1228 व मोटार सायकल क्र. UP-32-KF-6934 व जुगाराचे साहित्य असे एकुण 8,23,110 रू. चा मुद्देमाल जप्त केला तसेच लक्ष्मी मंदिर कदेर समोर तिर्रट जुगार खेळणारे 1) तानाजी भोजु बनसोडे रा. कदेर, 2) प्रमोद हणमंत कोराळे रा. कदेर, 3) सचिन बलभिम भाले रा. कदेर, 4) संतोष राम बनसोडे रा. कदेर, 5 ) रमेश रानबा बनसोडे रा. कदेर. 6) अरूण तात्याराव बनसोडे रा. कदेर यांचे ताब्यातुन रोख रक्कम, 02 मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकुण 16060 रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरूध्द महाराष्ट्र जुगार कायदयान्वये कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
  • सदर अवैध धंदयाविरूध्द केलेल्या कारवाई दरम्यान दि.02 / 08 / 2025 रोजी सकाळी पोलीस ठाणे उमरगा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे मौजे कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालु असणारे अवैध दारू विक्री, जुगार धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात असे निवेदन देवुन 12 तास उलटायचे आतच निवेदनकर्ते / सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद चव्हाण व आकाश दिलीप राठोड दोघे रा. सेवानगर तांडा कदेर हेच अवैधरित्या तिर्रट जुगार खेळताना पोलीसांच्या जाळयात अडकल्याने त्याबाबत गावात व परीसरात खमंग चर्चा होत आहे.
  • सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री. सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि गजानन पुजरवाड, सपोफौ / प्रदिप ओव्हळ, पोहेकॉ / 1470 कोनगुलवार, पोना / 1181 अनुरूद्र कावळे, पोकॉ / 1535 नवनाथ भोरे, पोकों / 1806 बाबासाहेब कांबळे केलेली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!