August 9, 2025

गायरान जमिनीवर चारा लागवडीचा उपक्रम

  • मनरेगा अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात अंमलबजावणीस प्रारंभ
  • धाराशिव (जिमाका) – मनरेगा योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील गायरान जमिनीवर चारा पिकांची लागवड सुरू करण्यात येत असून,यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.तहसीलदार,गट विकास अधिकारी,वन विभाग,सामाजिक वनीकरण आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या समन्वयाने ही कार्यवाही केली जात आहे.
    या उपक्रमाचा आढावा घेत अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील,अध्यक्ष कै. वसंतराव नाईक स्वालंबन मिशन, यांनी १ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर तालुक्यातील मानमोडी व मुर्दा या गावांतील गायरान गट क्र.२०२ मध्ये १ हेक्टर क्षेत्रात चारा लागवडीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी चारा लागवड प्रक्षेत्राचे उद्घाटन केले तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना व पशुपालकांना मार्गदर्शन करत चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना अधिकाधिक चारा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
    या प्रसंगी तहसीलदार अरविंद बोळंगे,गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे,सरपंच गोपाळ सुरवसे तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!