August 9, 2025

ऊस बिल थकवणाऱ्या साखर व गुळ कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांचा आवाज

  • धाराशिव – पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्याप ऊसाचे बिल न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी साखर व गुळ उद्योजकांविरोधात आवाज उठवला आहे. काही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे ऊस बिल गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर दीपक जाधव व इतर शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना किती टक्के ऊस बिल अदा केले आहे, व किती रक्कम थकीत आहे,याबाबत संपूर्ण अहवाल मागवण्याची मागणी करण्यात आली.
    या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले असून, लवकरच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील साखर व गुळ कारखान्यांचा तपशीलवार अहवाल उपलब्ध करून दिला जाईल,अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.
    यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी वृक्षलागवडीद्वारे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नाव ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!