कळंब – आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या हजारो वारकऱ्यांची कळंबमध्ये सेवा करत शिवसेनेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे सात हजार पेक्षा अधिक वारकऱ्यांना शाबुदाणा खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. शहरातील बस स्थानक पारिसरात दत्त मंदिराच्या शेजारी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. “क्षुधेलिया अन्न ! दयावे पाञ न विचारून !! धर्म आहे वर्मा अंगी ! कळले पाहीजे प्रसंगी !!” या तुकोबारायांच्या अभंगात अन्नदानाचे महत्व अधोरेखित केले आहे. भुकेल्याला अन्न देणे हाच खरा धर्म आहे, हे या ओळींमधून स्पष्ट होते. या आध्यात्मिक प्रेरणेने भारलेले अनेक अन्नदाते दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा बजावत आहेत. कळंब शहरातून पंढरपूरकडे पायी व वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कळंब शहरासह येरमाळा रोडवर अन्नदान करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींची रेलचेल पाहायला मिळाली. शिवसेना कळंब तालुक्याच्या वतीने बस स्थानकावर सकाळपासूनच खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले…. फराळाचे वाटप शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनंत वाघमारे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे, शहरप्रमुख गजानन चोंदे,शितल चोंदे,सतपाल बनसोडे,माणिक बोंदर,किशोर वाघमारे,रोहन पारख,हर्षद अंबूरे,अतुल कवडे, विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला,युवराज पिंगळे,बंटी चोंदे, माणिक बोंदर,स्वप्नील पिंगळे,पिनु जाधवर,युवराज धाकतोडे,श्रीकांत पिंगळे,किरण बोराडे,धनंजय दळवी, लखन गायकवाड,सुनील गायकवाड,तीर्थकर सर,राजेंद्र बिक्कड,भैय्या कोमटवार ,दीपक यादव,स्वरूप पिंगळे,यश जाधव, सागर शिंदे,ओम भाग्यवंत,राहुल वाघमारे,अविनाश वाघमारे,रोहन पांगे,गणेश भोसले,शिवा शिंगणापुरे,सोमनाथ साबळे,भरत पिंगळे,सोनू बोराडे,आण्णा पिंगळे,सुजित लिमकर,गणेश जाधव,भास्कर पिंगळे, सुमित रणदिवे, आबा शेंडगे,विकास कदम,निकेतन ढवारे,अब्दुल मुलानी, गुरुलिंग शिंगणापूरे, स्वप्नील वडदिले,तेजस जाधवर,बालाजी हुंबे, हर्षवर्धन कोकीळ,वैभव संगवे,रोहन पारख,बालाजी शिंदे,रामेश्वर गायके,विजय पारवे,सुरेश शिंदे,अतुल कवडे,हर्षद अंबुरे, पोपट आंबिरकर,बालाजी काकडे, रामकिसन कोकाटे,बालाजी शिंदे, उमेश पिंगळे,मयूर पिंगळे, वैभव शिंदे,अभय गायकवाड, सतपाल बनसोडे,अंकुश लोहकरे, अखिल काझी यांच्यासह शेकडो शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. विदर्भ व मराठवाड्यातून पंढरपूरकडे दर्शनाला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासात कळंब शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आषाढी एकादशी दिवशी प्रवाशी वारकऱ्यांना फराळ हॉटेल मध्ये करावा लागत होता. त्यामुळे शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार मागील सहा वर्षांपासून आषाढी एकादशी दिवशी मोठ्या भक्तीभाव पध्दतीने फराळाचे वाटप करण्यात येते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर