धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यातील पशुपालक,विद्यार्थी व बेरोजगार युवकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या माध्यमातून ७ जुलै ते ११ जुलै २०२५ या कालावधीत पाच दिवसीय ऑनलाईन कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायास मोठा वाव असून,या प्रशिक्षणाद्वारे इच्छुकांना या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान मिळणार आहे.यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. प्रशिक्षण कालावधी : ७ जुलै ते ११ जुलै २०२५ असा निश्चित केला आहे. प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.प्रशिक्षण शुल्क : २०० प्रति लाभार्थी,लक्ष्य गट : सुशिक्षित बेरोजगार,पशुपालक,विद्यार्थी व कुक्कुटपालनास इच्छुक नागरिक यांचेसाठी आहे. संपर्कासाठी अधिकृत अधिकारी डॉ.वैभव पाटील,पशुधन विकास अधिकारी (९५२७२२५२७०), सतिश लोमटे,सहायक पशु विकास अधिकारी (८३२९४५४४५३) लक्ष्मण शेरीकर,वरिष्ठ सहाय्यक ( ९०११९४५४८९) यांचेशी संपर्क साधावा. पात्र व इच्छुक उमेदवारांनी तालुका पशुधन विकास अधिकारी (वि) किंवा सधन कुक्कुट विकास गट,धाराशिव यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला