August 9, 2025

संत नामदेव महाराजांच्या दिंडीचे स्वागत

  • कळंब ( माधवसिंग राजपूत )- आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी! जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर !!जेव्हा नव्हती गोदा,गंगा तेव्हा होती चंद्रभागा. मुखी हरिनाम घेत संत नामदेवांचे भजन गायन करीत भागवत धर्माची पताका राज्य व देशात घेऊन जाणारे संत नामदेव महाराज यांचे मुळगांव नरसी नामदेव ( जिल्हा हिंगोली ) येथून श्री क्षेत्र पंढरपूर कडे आषाढी वारीसाठी निघालेली दिंडीचे दिनांक २९ जून रोजी कळंब येथे १३ व्या दिवशी आगमन झाले.या दिंडीचे स्वागत कळंब येथील अन्नदाते सुरेश कल्याणकर यांनी केले श्री क्षेत्र नरसी नामदेव येथून १६ जून रोजी आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असून शनिवार ५ जुलै रोजी २० दिवसाचा प्रवास करून ही दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचत आहे या दिंडीत ,११०० महिला पुरुष वारकऱ्यांची संख्या असून यात महिला वारकऱ्यांची ७५० एवढी मोठी संख्या आहे रविवार ६ जून आषाढी एकादशी साठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडीतून हजारो वारकरी कळंब मार्गे विदर्भ मराठवाड्यातुन शेकडो किलोमीटर पायी मार्गक्रमण करीत असून नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या या दिंडीत महिलांचा मोठा सहभाग आहे.कळंब येथे दुपारच्या भोजनाची व्यवस्था कल्याणकर परिवाराच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून सुरेश कल्याणकर,डॉ.रमाकांत कल्याणकर,प्रा.डॉ.अमोल कल्याणकर,महेश कल्याणकर व परिवार यांच्यावतीने करण्यात येते. ही दिंडी पुढे कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथे मुक्कामासाठी पोंहचली.
error: Content is protected !!