कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रासेयो विभागाच्य वतीने शनिवार दि.२१ जून २०२५ रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगादिन’ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयच्या प्रांगणात करण्यात आले होते.यावेळी योगगुरु महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अनंत नरवडे यानी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना आजच्या दगदगीच्या जीवनात मानवांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योगा चा उपयोग कसा होत आहे याचे महत्व समजावून सांगितले. तसेच सर्वानी योगगुरु अनंत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांची योगासने व प्राणायम केली.त्यानी योग व आहार या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच जागतिक स्तरावर योगाचे महत्त्व कसे वाढत आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी सुद्धा योगा व आहार या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी एनएसएस विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर, प्रा.अभिमान ढाणे,आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप,प्रा.शफीक चौधरी डॉ. उद्धव गंभीरे डॉ.हनुमंत माने, प्रा.पंडित शिंदे, डॉ.रघुनाथ घाडगे, प्रा.शिव खबाले,प्रा.विनायक मिटकरी,प्रा.विजय घोळवे,प्रा.सोमनाथ कसबे, राजाभाऊ चोरघडे , प्रा.अमोल शिंगटे, डॉ.विद्युलता पवार,प्रा.सुनिता चोंदे,प्रा. बाबू पवार , श्री.किशोर फावडे ,जयसिंग, अर्जुन घोगरे , चौधरी,संजय शेंडग,सुंदर कदम,दत्ता गायकवाड.दत्तात्रय कोबंळे ,काका चोंदे, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा