मांडवा – जनता विद्यालय मांडवा ता.वाशी येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनानिमित्त सहशिक्षक रवींद्र अष्टेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने सादर करून त्याचे महत्त्व समजावून सांगितले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ग्रीष्मा देशमुख,सहशिक्षक सुधीर सातपुते,प्रदीप शिंदे,नंदलाल तडवी,रवींद्र अष्टेकर,सहशिक्षिका मेघा देशमुख,तसेच शाळेतील इतर शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकवर्गाकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या वेळी सर्वांनी मिळून नियमित योगाभ्यासाचा निर्धार केला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड