कळंब – सध्या राज्य सरकारने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उपस्थित ठेवून त्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्याला शाळेची ओढ निर्माण होऊन आपुलकी तयार होते असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. ते तालुक्यातील सौंदणा अंबा येथील संत गोरोबा काका विद्यालयातील शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,माजी कुलगुरू मधुकर गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळंब तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी लकडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकांत सुर्यवंशी, लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे,भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंके, नंदू समुद्रे,मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता नरवडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना काळे म्हणाले की, यावर्षी शासनाने शाळा सुरू होण्याच्या अगोदरच मोफत पाठय़पुस्तके व गणवेश प्रत्येक शाळेत पोहच केले. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा शाळेत येण्यासाठीची प्रमुख अडचण संपलेली आहे. शिक्षणाशिवाय आता आयुष्याला दिशाच मिळू शकत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पुर्ण करून आयुष्यात यशस्वी व्हावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता नरवडे यांनी केले तर सुत्रसंचालन भाऊसाहेब आवाड यांनी केले आभार जाधव सुरेश यांनी केले.
तालुक्यात या शाळांना दिल्या भेटी –
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाना आंबा, रांजणी, नायगाव, घारगाव, लोकनायक माध्यमिक विद्यालय नायगाव, कृषी विद्यालय नायगाव, संत गोरोबा काका विद्यालय सौदणा अंबा, हनुमान माध्यमिक विद्यालय घारगाव, हजरत खाजा बदरोदीन विद्यालय रांजणी या शाळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
More Stories
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे
डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेद शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण