August 9, 2025

डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेद शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेद शैक्षणिक संकुल,कळंब येथे दि.२० जून २०२५ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.विशेष म्हणजे,दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या वृक्षांचा “वाढदिवस”ही यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
    या उपक्रमात भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने, भैरवनाथ आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे,अविनाश म्हेत्रे, राजकुमार शिंदे,अर्जुन मंडाळे, लिपिक आदित्य गायकवाड,सेवक विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचे भान जपले.
    डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला.या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती होत असून, संस्थेची ‘हरित व शाश्वत परिसर’ या दिशेने वाटचाल सुरू आहे.
error: Content is protected !!