कळंब – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वर्गीय पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यपद्धतीवर चर्चा झाली. स्थानिक पातळीवरील विकास, जनसंपर्क आणि युवाशक्तीला दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यावरही भर देण्यात आला. या प्रसंगी कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे,उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे,शहरप्रमुख विश्वजित जाधव,निवडणूक प्रमुख संजय मुंदडा,जिल्हा संघटक दिलीप पाटील,शाम नाना खबाले,सागर बाराते,सुधाकर टेळे,संजय भोसले, शशिकांत पाटील,बिभीषण गायकवाड,कल्याण गुरसाळे, विठ्ठल समुद्रे,संतोष लांडगे, डॉ. रूपेश कवडे,आम्रत जाधव, समाधान बाराते,रामेश्वर जमाले, संतोष पवार,संजित मस्के, निखिल कापसे,अॅड.मनोज चोंदे, बाळासाहेब गंभीरे,उत्तम जाधव, भारत जाधव,लक्ष्मण रितापुरे, अफसर पठाण,तोशिम मिर्झा, अजहर पठाण,खंडू लांडगे,मुकुंद साखरे,रामदास गायकवाड,दत्ता चौधरी,निर्भय घुले,प्रदीप फरताडे, तैय्यब खुरेशी,अक्षय कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले