धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक ) उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांनी नुकताच स्विकारला.याबद्ल राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ धाराशिव च्या वतीने जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,सुनिल चव्हाण, कल्याण बापु बेताळे यांनी केला. सांगळे यांच्या सेवानिवृत्ती मुळे सदरील पदाचा पदभार जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी जंगम साहेब यांच्या कडे दिला.यावेळी त्यांनी सांगितले की या पदाचा सदुपयोग सर्व सामान्यांच्या विकासासाठी जितका करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करीन.विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नाला योग्य तो न्याय दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.
More Stories
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा : ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान
नवतेजस्विनी महोत्सवात महिला उद्योजकतेची झेप;दोन दिवसांत ७ लाखांहून अधिक विक्री