September 24, 2026

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती

  • धाराशिव (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय,धाराशिव मार्फत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.ही शिष्यवृत्ती इयत्ता १० वी,१२ वी, पदवी, पदव्युत्तर,वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.या शिष्यवृत्तीचे पात्रतेचे निकष असे आहेत की,अर्जदाराने मागील परीक्षेत किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. निवड ही गुणांच्या आधारे आणि उपलब्ध निधीच्या मर्यादेत जेष्ठता व गुणवत्ता यादी नुसार केली जाणार आहे.
    अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : स्वहस्ताक्षरित अर्ज मोबाईल क्रमांकासह शाळा सोडल्याचा दाखला,गुणपत्रक,पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा/पावती, आधार कार्ड,जात प्रमाणपत्र वरील सर्व कागदपत्रे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळमजला, धाराशिव या पत्त्यावर २० जुलै २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावीत किंवा टपालाद्वारे पाठवावीत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
    जिल्ह्यातील मागासवर्गीय,विशेषतः मांग-मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.एल.ए.क्षीरसागर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी
    दूरध्वनी क्र.०२४७२-२२६६०२ यावर संपर्क साधावा.
error: Content is protected !!