कळंब- गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या उबाठा शिवसेनेच्या कळंब तालुका प्रमुखासह युवासेना,शिवसेना व विधानसभा प्रमुखांच्या निवडी अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तालुका प्रमुखपदी सचिन काळे यांची निवड करण्यात आली आहे. कळंब तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेत अगोरदच पडलेली फुट आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी शिंदे सेनेची धरलेली वाट,त्यामुळे अनेकाकरे पदे उबाठा शिवसेनेमध्ये रिक्त होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना कोणत्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार,याबाबत शिवसैनिकांमध्ये चर्चा होती. परंतु खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास घाडगे पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारेच शिलेदार निवडले,अशी भावना शिवसैनिकांत दिसुन येत आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून डिकसळचे माजी उपसरपंच सचिन काळे, तर युवासेनेचे तालुकाप्रमुख पाथर्डी येथील तरूण कार्यकर्ते पंडित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा समन्वयक म्हणून माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी युवा सेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे यांची निवड करण्यात आली आहे. सेनेचे उपतालुकाप्रमुख भारत सांगळे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सौंदणा येथील युवक संदीप पालकर यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रमाणे अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्याने जबाबदारी घेतलेले पदाधिकारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपले अस्तित्व सिद्ध करणार का,हे येणाऱ्या काळातच दिसुन येईल.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात