August 9, 2025

शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे कळंब शहरात भव्य उदघाटन

  • कळंब – शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि.१२ जून २०२५ वार गुरुवार रोजी रोजी राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते भव्य स्वरूपात संपन्न झाले.
    या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पिंगळे यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अजित पिंगळे हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहेत.हे कार्यालय म्हणजे जनतेसाठी एक विश्वासाचे ठिकाण असेल,जेथे त्यांच्या अडचणींवर मार्ग शोधला जाईल.”
    कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध मान्यवर,शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    विशेषत माजी आमदार ज्ञानराज चौगुले,किरण गायकवाड, भगवान देवकते,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,सुरज साळुंके,कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजी कापसे,संदीप मडके,रोहन पारख,तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,उपजिल्हा प्रमुख आनंत वाघमारे,शहर प्रमुख गजानन चोंदे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनंत लंगडे,संजय बारकुल,अमोल माकोडे,अमोल पाटील,बाळासाहेब शिनगारे,हरिभाऊ तोडकर,मुस्ताक कुरेशी,अतुल कवडे,दत्ता शेंडगे,अर्जुन लोमटे, सुधाकर महाजन,सुशील चोरघडे,सुखदेव राखुंडे,प्रशांत शेळके,आदित्य कोकाटे,ओंकार आडसुळ,लामतुरे बापू,विशाल शितोळे,सुरेश इंगळे,युवराज पिंगळे, पिनू जाधवर,किरण बोराडे,सागर शिंदे,स्वरूप पिंगळे,विशाल बोराडे,अखिल काझी ,निकेतन ढवारे,अंकुश लोहकरे,रोहित मुंढे,रोहन पांगे, ओम भाग्यवंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
    या उद्घाटन सोहळ्यामुळे कळंब शहरात शिवसेनेचा जनसंपर्क अधिक व्यापक होणार असून, हे कार्यालय नागरिकांसाठी नेहमी खुले राहील.स्थानिक समस्यांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी हे केंद्र एक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओघवत्या शैलीत पार पडले, तर शेवटी शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानत शिवसेनेचे हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी महत्वाचा केंद्रबिंदू ठरेल असे नमूद केले.
error: Content is protected !!