August 9, 2025

सेवानिवृत्त मुख्याध्यापक लहु (दादा) कावळे यांचा सत्कार समारंभ संपन्न

  • कळंब – कळंब तालुक्यातील नायगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक लहु (दादा) कावळे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात चार दशके अहोरात्र सेवा करून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या कावळे सरांच्या योगदानाला यावेळी उपस्थितांनी मानाचा मुजरा केला.
  • या सत्कार समारंभास कळंब नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग (तात्या) कुंभार,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.प्रकाश धस, इंजि.शंकर यादव,सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोरे,संजय जाधवर,लक्ष्मण लाखे,प्रगतशील शेतकरी पोपट सोमासे,संजय टेकाळे,कालिदास टेकाळे, प्रकाश टेकाळे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत कावळे सरांनी घेतलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत,शाळेच्या प्रगतीसाठी दाखवलेले नेतृत्व, तसेच शैक्षणिक मूल्यांची जोपासना याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
    समारंभाच्या शेवटी कावळे सरांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
error: Content is protected !!