June 20, 2025

वेद शैक्षणिक संकुलात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब येथे दि.६ जुन २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन हा सामाजिक समरसतेचा संदेश देत उत्साहात संपन्न झाला.
    या कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार
    पार पडला.
    हा कार्यक्रम भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांच्या अध्यक्षतेखाली
    “सामाजिक समरसता” या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पाथर्डी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन,रांजणीचे प्राचार्य जगदीश गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
    यावेळी प्राचार्य जगदीश गवळी यांनी सामाजिक समरसता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तर मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोन देणारे मोलाचे विचार मांडले.
    या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा,शिवकालीन वेशभूषा स्पर्धा,शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटन (ड्रॉईंग),शिवरायांवरील रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
    विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कलात्मकता व इतिहासप्रेम दाखवले.विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी केले तर आभार राजकुमार शिंदे यांनी मानले.
    या वेळी निदेशक अर्जुन मंडाळे,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशिका कोमल मगर, आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,पालक,माजी विद्यार्थी,ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!