धाराशिव (जिमाका) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे महाडीबीटी डाटा अद्ययावत करण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी संगणक ऑपरेटरच्या दोन जागा तात्पुरत्या भरावयाच्या आहेत. या पदांसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या माजी सैनिक व विधवा यांना प्राधान्य दिले जाणार आहे.संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिकांचे पाल्य तसेच नागरी संवर्गातील पात्र उमेदवारांनाही संधी दिली जाईल. पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२५ असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सैनिक सेवेचे तसेच शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर करावेत.निवड प्रक्रियेअंतर्गत मुलाखत दि.११ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेतली जाईल. उमेदवाराकडे संगणकावर डाटा फीडिंगचे आवश्यक ज्ञान असणे अपेक्षित आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२–२२२५५७ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५२७५५४ वर संपर्क साधावा.या संधीचा लाभ जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, त्यांच्या पाल्यांनी तसेच नागरी उमेदवारांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य