June 19, 2025

नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव

  • नळदुर्ग — तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील कन्या प्रशालेतून एस.एस.सी. मार्च 2025 परीक्षेत दि.28 मे 2025 रोजी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
    यावेळी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत शाळेच्या गुणवत्तेचे व शिस्तप्रियतेचे कौतुक करण्यात आले.
    प्रशालेतून प्रथम क्रमांक कु. प्रतिक्षा संतोष मुळे (90.60%), द्वितीय कु. मनिषा संजय राठोड (82%), व तृतीय कु.बेग मिर्झामिद्दतजुआ अल्ताफ (81.20%) यांनी मिळवला.यंदा शाळेचा एकूण निकाल ९५% लागला.
  • या यशस्वी विद्यार्थिनींना शिकवणाऱ्या शिक्षकांमध्ये श्रीम. निर्मला गावित,लिलावती कौरव, अश्विनी साळूंखे,हारुण आतार तसेच प्रा.मिलिंद कुलकर्णी, सत्तेश्वर जाधव व दत्तू सगर यांचा शालेय व्यवस्थापन समितीने विशेष सत्कार केला व अभिनंदन केले.
    कन्या प्रशालेत नियमितपणे सहली,सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा,मोफत गणवेश, शॉक्स-शूज,पुस्तके,वाचन कोपरा इत्यादी उपक्रम राबवले जातात.याशिवाय परीसरातील इतर शाळांमध्ये नसलेले ‘ब्युटी & वेलनेस’ व ‘मल्टी स्किल’ हे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमही येथे उपलब्ध असून,त्याचा फायदा घेऊन अनेक विद्यार्थिनी १०वी नंतर स्वतःचा व्यवसाय करत आहेत.
    मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड,शा.व्य.स.अध्यक्षा श्रीम.राणी धनराज वाघमारे, उपाध्यक्ष श्री.संजय राठोड, तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक अ‍ॅड. डॉ. पोळे व सर्व सदस्यांनी अधिकाधिक विद्यार्थिनींनी कन्या प्रशाला,नळदुर्ग येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.
    कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थिनींना गुणपत्रकांचे वाटप करण्यात आले.
error: Content is protected !!