June 20, 2025

प्रियदर्शनी अर्बन बँकेला पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार

  • कळंब – दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेमध्ये औरंगाबाद विभागातून रु.१०० कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमधून सन २०२३ – २०२४ सालासाठी पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि.कळंब बँकेची निवड करण्यांत आलेली आहे.
    याविषयीचे पत्र दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनने प्रियदर्शनी अर्बन बँकेचे चेअरमन प्रा.श्रीधर भवर यांना पाठविले असून त्यांनी या पत्रात चेअरमन, संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश संपादन केले आहे.याबद्दल सहकार चळवळी तर्फे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!