February 9, 2026

नवनियुक्त आय.एम.सी.सदस्यांचे स्वागत

  • कळंब – तालुक्यातील संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे शासनाकडून नियुक्त संस्था व्यवस्थापन समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
    संस्थेच्या विकासात्मक उन्नतीसाठी निर्णय घेणे,त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संस्था व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली असते.यामध्ये शासनाकडून मिळालेल्या सदस्यामुळे संस्थेची तसेच प्रशिक्षणार्थ्याच्या निर्माण होणाऱ्या समस्या शासनदरबारी सोडवण्यास मोठी मदत होणार आहे. समाजसेवेत अनेक दशकापासून कार्यरत असलेले ज्यांना समाजातील अडचणीची जाण असून ते सोडवण्यास स्वतः तत्पर असणाऱ्या तालुक्यातील तीन जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये अनाथ बालकांच्या भविष्यासाठी मागील 30 वर्षापासून झिजणारे महादेव महाराज अडसूळ, दीन दलितांसाठी अनेक वर्षापासून लढणारे शिवाजी शिरसाट, ग्रामीण भागातील सर्वसामान्याच्या अडचणी सोडवणारे नवनाथ खोडसे यांची थेट शासनाद्वारे निवड करण्यात आली आहे. त्यांचे स्वागत संस्थेतर्फे करण्यात आले. त्याचबरोबर पुणे येथील वृंदावन फाऊंडेशन तर्फे आशा राऊत यांच्यावतीने सर्व सदस्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य केशव पवार, गटनिदेशक शामकांत डोंगे, आय एम सी सदस्य गोविंद करडे, वृंदावन फाऊंडेशन च्या सदस्या आशा राऊत, वरिष्ठ लिपीक विलास सुरवसे, भंडारपाल बाजीराव राऊत, शिल्पनिदेशिका गोदावरी वडजकर, रंजना फुलारी, कोमल मेंडके, ज्योती शिंदे, शिल्पनिदेशक अंकुश माळकर, सुजित दंडनाईक, नितेश पडघाण, धैर्यशील मडके, विश्वनाथ पाटील, तेजस गुटाळ, मंचक जाधव, अक्षय सुतार, वसंत टोपे, नदीम शेख, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, रवींद्र जेठिथोर, फर्जना शेख, सिद्धेश्वर मडके, समाधान सुरवसे आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!