June 20, 2025

सरस्वती विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील सरस्वती विद्यालयाचा ९७.०५% टक्के निकाल लागला.
    फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेलेल्या१० वीच्या बोर्ड परिक्षेत सरस्वती विद्यालय गोविंदपूर या शाळेतील विद्यार्थीनी कु.आपेक्षा बबन मुंडे हिने ९४.४0% गुण घेवून शाळेतून व मंगरूळ येथील परिक्षा केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला.तसेच दत्ता विष्णू मुंडे याने ९0.८0% गुण घेवून शाळेतून व्दितीय क्रमांक मिळवला तर गायत्री कृष्णा मेणकुदळे हिने ८९.८०% गुण घेवून तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतील १४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ,फेटा बांधून, पुष्पहार व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
    यावेळी संस्थेचे सचिव वैभव उमाकांत मुंडे,शाळेचे मुख्याध्यापक बन्सी हरीभाऊ शेळके,शिक्षक बाळू विठ्ठल सावंत, हिरालाल भागवत मुंडे, शाहूराव नरहरी राऊत,बालाजी सुरवसे,शिक्षकेत्तर कर्मचारी जनार्धन सुरवसे,सुरेखा मस्के व विद्यार्थ्याचे आईवडील उपस्थित होते.
    कार्यकमाचे सुत्रसंचालन हिरालाल मुंडे यांनी केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
error: Content is protected !!