February 8, 2026

मराठा सेवा संघाच्या वतीने शंभूराजांना अभिवादन

  • कळंब (महेश फाटक ) – मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती चारित्र्य संपन्न,नीतिमान प्रशासक,शिवपुत्र छावा,राजकार्य धुरंधर,प्रख्यात पंडित, साहित्यिक,स्वराज्यरक्षक, क्षात्रवीर,छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्यासह शंभू प्रेमीनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.
    यावेळी मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवश्री अर्जुन तनपुरे, विभागीय अध्यक्ष प्रकाश धस, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.जगदीश गवळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी,तालुकाध्यक्ष दत्ता कवडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनिल फाटक, सचिव अरविंद शिंदे इमरान मिर्झा,डेंगळे, डिकसळ चे उपसरपंच हरिभाऊ कुंभार,शिवाजीराव गिड्डे, विश्वजीत जाधव,ज्योतीताई सपाटे,अँड.अशोक चोंदे, रणजीत पवार,अनिल जाधव, काकासाहेब जाधव,माजी उपनगराध्यक्ष गायकवाड आदीसह समाजबांधव व शिवशंभोप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.फटाक्यांची आतिषबाजी आणि शंभूराजांच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणाणून गेला होता.
error: Content is protected !!