June 21, 2025

प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने आडसुळ व शिरसट यांचा सत्कार

  • कळंब – श्री संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब येथे महाराष्ट्र शासनामार्फत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त झाल्याबद्दल ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ व रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसट यांचा दि.१२ मे २०२५ वार सोमवार रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साक्षी पावनज्योतचा बुध्द जयंती विशेषांक अध्यक्ष सुभाष द.घोडके व कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला.
    या सत्कार सोहळ्यास जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,उपसंपादक माधवसिंग राजपूत व सचिव प्रा.अविनाश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या निमित्ताने सामाजिक कार्याच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करत “प्रबुद्ध रंगभूमी” बहुउद्देशीय संस्थेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.
error: Content is protected !!