कळंब – तथागत गौतम बुद्धांनी शुचिता आणि करुणेच्या मार्गाने दुःखमुक्त जीवनाची दिशा स्पष्टपणे दाखवली आहे व बुद्धांनी सांगितलेल्या चार आर्य सत्यांमधून जीवनातील दुःख, त्याची कारणं,त्यावर उपाय आणि दुःखमुक्तीचा मार्ग, अष्टांगिक मार्ग यांचे विज्ञानात्मक विवेचन केले आहे.त्यांनी मानवाला अंधश्रद्धा,भेदभाव आणि अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला असून तथागत बुद्धांनी दुःखमुक्त जीवनाची दिशा दाखवली असे प्रतिपादन बौद्धाचार्य सुनील गायकवाड यांनी केले.कळंब शहरात दि.१२ मे २०२५ वार सोमवारी रोजी २५५९ वी बुद्ध पौर्णिमा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पुतळा परिसर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर त्रिशरण आणि पंचशील पूजा सामुदायिक रित्या घेण्यात आली. याप्रसंगी महादेव आडसुळ महाराज, डॉ.शंकर कांबळे,रिपाइंचे मराठवाडा नेते बंडू भाऊ बनसोडे,तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसट,लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,नागेश धीरे, भारतीय जनता पार्टीचे सतपाल बनसोडे,सुमित रणदिवे,कुंदन गायकवाड,मोहन गायकवाड,प्रमोद ताटे,माणिक गायकवाड,शहाजी शिरसट आदींची उपस्थिती होती.
More Stories
शहरासह ग्रामीण भागात रामनवमी उत्साहात साजरी
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा