May 11, 2026

शिवसेना ही सामान्य माणसांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आहे – अजित पिंगळे

  • बोरगाव (ध) येथे शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साही वातावरणात संपन्न

  • बोरगाव (ध) – शिवसेनेच्या या नवीन शाखेच्या स्थापनेमुळे बोरगाव (ध) परिसरात पक्ष अधिक बळकट होणार असून,स्थानिक विकासकामे,जनतेच्या समस्या आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा नेते अजित (दादा) पिंगळे यांनी प्रतिपादन केले.
    तालुक्यातील बोरगाव (ध) येथे शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन दि.७ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात पार पडले.या उद्घाटनाचे आयोजन शिवसेनेचे मार्गदर्शक सुशील चोरघडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.या प्रसंगी ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून,गावात सकारात्मक उर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून अजित (दादा) पिंगळे यांनी उपस्थित राहून शाखेचे उद्घाटन केले.यावेळी ते पुढे बोलतानी म्हणाले की,
    “शिवसेना ही सामान्य माणसांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आहे.ग्रामीण भागात पक्षाचे कार्य प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा शाखांचा विस्तार अत्यंत गरजेचा आहे व बोरगाव (ध) येथील जनतेला शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी व सामाजिक कार्याला गती देण्यासाठी ही आगामी काळात कटिबद्ध राहील.”
    या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,तसेच अनंत लंगडे यांची विशेष उपस्थिती लाभली.त्यांनी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
    शाखेची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे –
    शाखा प्रमुख – अमोल चोरघडे,उपप्रमुख- सचिन चोरघडे,कार्यध्यक्ष-मनोहर सांगळे
    कोषाध्यक्ष – अतुल जाधव,सचिव – गजानन पाटील,महासचिव – बालाजी सांगळे,संघटक- अशोक चोरघडे,रणजीत चोरघडे.
    कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी अत्यंत मन:पूर्वक केले होते.या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,युवक, शिवसैनिक आणि शिवसेना समर्थक उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सुशील चोरघडे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले.
error: Content is protected !!