श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्समध्ये आ. पाटील व डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा भागीदार म्हणून समावेश
धाराशिव (सतिश घोडेराव) – परभणी तालुक्यातील तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे नवे भागीदार म्हणून आ.डॉ.राहुल पाटील व धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा समावेश झाला असल्याची माहिती शुगर्स प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या भागीदारीमुळे साखर कारखानदारीत पाटील कुटुंबीयांनी पाऊल टाकल्याने श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड.न.चि.जाधव यांनी स्वागत केले.आतापर्यंत कारखाना शेतकरी आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवित आहे. आ.डॉ.पाटील यांच्या सहभागाने या प्रयत्नांना अधिक बळकटी येईल.येत्या गळीत हंगामापासून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याच्या दृष्टीने एकत्र बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे भागीदार म्हणून कारखान्यात सहभागी झाल्याबद्दल आ.डॉ.पाटील यांचे स्वागत ॲड.न.चि.जाधव,प्रमोद जाधव यांनी स्वागत केले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी