धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 187 कारवाया करुन 1,46,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बाबु त्रिंबक शिंदे, वय 45 वर्षे, रा. बोरगाव (ध) ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.04.2025 रोजी 11.30 वा. सु.बोरगाव(ध) येथे आपल्या पत्र्याचे टपरीचे समोरील बाजूस अंदाजे 2,600₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशोक महादेव कदम, वय 50 वर्षे, रा.कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.26.04.2025 रोजी 15.10 वा. सु.आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,200₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे:आरोपी नामे-यतीराज मधुकर क्षिरसागर, वय 41 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.04.2025 रोजी 19.45 वा. सु.सिंदफळ पाटीवरील लल्ला स्नॅक सेंटर व पान शॉप समोर अंदाजे 1,075₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.26.04.2025 रोजी 17.30 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत कमानवेस जवळील भोला रसवंती समोर तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अमोल शंकर इंगळे, वय 36 वर्षे रा.अयोध्या नगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.30 वा.सु. कमानवेस जवळील भोला रसवंती समोर तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 610 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-विकास माणिक राठोड, अर्जुन शाहुराज पवार, विष्णु शाहुराज पवार, रा. उजनी तांडा ता. औसा जि. लातुर, सुभाष सखाराम जाधव, समाधान बब्रुवान राठोड, उषा बळी जाधव, वर्षा सुभाष जाधव, मिरा बब्रुवान राठोड, पारु माणिक राठोड सर्व रा. मेंढा तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.25.04.2025 रोजी 16.00 वा. सु. मेंढा तांडा येथे फिर्यादी नामे-बलभिम रामा राठोड, वय 48 वर्षे, रा. मेंढा तांडा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी लग्नात जेवण वाढण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडने मारहाण करुन जखमी केले.तसेच भांडण सोडवण्यास आलेले साक्षीदार यांनाही नमुद आरोपींनी मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बलभिम राठोड यांनी दि.26.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-युवराज नानासाहेब उमाटे, हणुमंत हरिदास मुळे, नानासाहेब उमाटे, इतर चार इसम सर्व रा. अंजनगाव ता. माढा जि. सोलापूर यांनी दि.24.04.2025 रोजी 22.00 वा. सु. लोणी शिवारात फिर्यादी नामे-विलास लक्ष्मण केमदारणे, वय 49 वर्षे, रा. लोणी ता. परंडा जि. धाराशिव ह.मु. इको सिटी, वह्राळे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे यांना नमुद आरोपींनी जुन्या भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या गाडीला ईरटिगा कार क्र एमएच 09 एफ जे 6454 ही आडवी लावून रस्ता आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉडने मारहाण करुन जखमी केली. तसेच चार तोळे वजनाची सोन्याची चैन, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम 35,000₹. काढून घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विलास केमदारणे यांनी दि.26.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 126(2), 118(1),115(2),119(1), 189(2) 191(2),191(3), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अवि दिलीप भोसले, सन्या दिलीप भोसले, रवि टरलिंग्या पवार, विजय दिलीप भोसले, केशव चिप्या पवार, कालिंदा दिलीप भोसले, चिमी अविनाश भोसले, पल्लवी विजय भोसले, काजल अजय भोसले, अजय दिलीप भोसले सर्व रा. पाटोदा ता. जि. धाराशिव यांनी दि.22.04.2025 रोजी 15.30 वा. सु. पाटोदा येथे फिर्यादी नामे-उषा दिनेश शिंदे, वय 34 वर्षे, रा. समर्थ नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे पती दिनेश शिंदे यांना नमुद आरोपींनी चोरी करु नका असे सांगण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही मारहाण करुन जखमी केले. दिनेश यास मोटरसायकलवर बसवून अज्ञात ठिकाणी घेवून गेले आहेत. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उषा शिंदे यांनी दि.26.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 115(2), 352, 137(2), 189(2), 191(2)(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-समाधान उध्दव जाधव, अनिकेत संतोष राठोड, बलभिम रामा राठोड, नितीन माणिक जाधव, किसन रामा राठोड, विकास नागनाथ राठोड, सुमित धोंडीराम जाधव, कलावती बलभिम राठोड, छाया संतोष राठोड सर्व रा. मेढां तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.25.04.2025 रोजी 16.30 वा. सु. मेंढा तांडा येथे फिर्यादी नामे-सुभाष सखाराम जाधव, वय 39 वर्षे, रा. मेंढा तांडा ता. जि. धाराशिव यांचा मावस भाउ अर्जुन शाहुराज पवार हे जेवण करत असताना तेथुन फिरणाऱ्या लोकांमुळे ताटात माती पडत आहे असे बोलण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडने मारहाण करुन जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यास आलेले साक्षीदार यांनाही नमुद आरोपींनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुभाष जाधव यांनी दि.26.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 189(2), 191(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-पांडुरंग दिगंबर सोनटक्के, महादेव सोनटक्के, दिगंबर सोनटक्के, इतर दोन इसम रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.04.2025 रोजी 10.30 वा. सु. गंधोरा येथील रिन्यु कंपनी येथील सब स्टेशन येथे फिर्यादी नामे-रामेश्वर अशोक जाधव,वय 34 वर्षे, व्यवसाय सुरक्षा रक्षक रा. शिरगापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व सोबतचे प्रल्हाद थाटकर, सुरक्षा रक्षक शितल देवकर, व देउबाई वाघमारे यांना नमुद आरोपींनी सहदेव सोनटक्के यास कामावरुन काढण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केली. फिर्यादी हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे शासकीय काम करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामेश्वर जाधव यांनी दि.26.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 132, 118(1), 115(2),352, 189(2) 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दत्ता अंकुश रेवन केळे, दिपक रेवन केळे रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.25.04.2025 रोजी 13.30 वा. सु. केळेवाडी येथे फिर्यादी नामे-प्रतापसिंह नरसिंह कांबळे, वय 40 वर्षे,रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडाणाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केली. तसेच फिर्यादीची पत्नी पल्लवी व वडील नरसिंग कांबळे हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहण केली. तसेच फिर्यादीचे पत्नीचे गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसुत्र झटापटीत तुटून पडले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रतापसिंह कांबळे यांनी दि.26.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),324(4), 3(5), सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (1) (आर) (एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
उमरगा पोलीस ठाणे :एका गावातील 28 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.27.12.2024 रोजी 10.00 वा. सु.ते आज पावेतो हिस गावातील एका तरुणांनी करुन मारहाण करुन धमकी देवून बळजबरी त्याच्या मित्राचे कारमध्ये घेवून जावून शेतात तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिस गरोदर करण्यास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.26.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(2), 87, 115(2), 351(2), 351(3), 3(5) कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील