June 20, 2025

एकदिवसीय शिक्षक व प्राध्यापक कार्यशाळा उत्साहात संपन्न

कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात शिक्षक व प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.

कार्यशाळेच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्यास शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन तृप्ती अंधारे (शिक्षणाधिकारी, नियोजन, जिल्हा परिषद, लातूर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक व प्राध्यापकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी तसेच गुणवत्तावर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल होते.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अधिव्याख्याता सुचित्रा जाधव (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव) यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने NCF (National Curriculum Framework) व SCF (State Curriculum Framework) या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात संस्थेतील तज्ञशिक्षक धनंजय डोळस यांनी “नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका”,तर सोपान पवार यांनी “२१व्या शतकातील कौशल्ये व भविष्यवेधी शिक्षण”, तसेच डॉ.माधव गोरे यांनी “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष तरतुदी”याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिवचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे आणि लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.डॉ.मोरे यांनी आपल्या विनोदी आणि प्रभावी शैलीतून शिक्षक आणि प्राध्यापकांना नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमाला ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, संचालक डॉ.डी.एस.जाधव,डॉ. संजय कांबळे,प्रा.वसंत मडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,संचालिका प्रा. अंजलीताई मोहेकर,अलकाताई मोहेकर यांच्यासह कळंब पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी प्राचार्य शिवाजी पौळ,प्राचार्य संजय जगताप,प्राचार्य अजित साळवे,प्राचार्य दिगंबर खामकर, मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, मुख्याध्यापक सुभाष लाटे, मुख्याध्यापक सुनील पांचाळ, मुख्याध्यापक नागनाथ सूर्यवंशी, लातूर बोर्डाचे संचालक प्रा. सुशील शेळके,उपप्राचार्य प्रा.अप्पासाहेब मिटकरी, उपमुख्याध्यापक विक्रम मायाचारी,पर्यवेक्षक श्रीमती जगदेवी कोळी,गंगाधर डबे, श्रीनिवास पांचाळ यांच्यासह ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेतील विविध शाळा, कॉलेजमधील २५० शिक्षक, प्राध्यापकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संभाजी गिड्डे, मुख्याध्यापक आनंद रामटेके, प्रा.नवनाथ करंजकर,प्रा. जे.एच.काझी यांनी केले तर आभार सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक प्रा.अरविंद शिंदे यांनी मानले.
ही कार्यशाळा सर्वच शिक्षक व प्राध्यापकांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि नव्या दिशा दाखवणारी ठरली.

error: Content is protected !!