June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 119 कारवाया करुन 74,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-माणिक मनोहर मुसांडे, वय 59 वर्षे, रा.धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.24.04.2025 रोजी 11.00 वा. सु.धानुरी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,800₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.24.04.2025 रोजी 16.25 ते 17.10वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-अजीम पाशा बागवान, वय 21 वर्षे,रा.बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 17.10 वा.सु. बागवान चौक देवी मंदीर रोडचे बाजूस कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 810 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-शरद नवनाथ कापसे, वय 40 वर्षे, रा. आंदोरा ता.कळंब जि. धाराशिव हे 16.25 वा.सु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आठवडी बाजार रोडच्या बाजूस कळंब येथे मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,090 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-कृष्णा नागनाथ शिंगाडे, वय 30 वर्षे, रा.बौध्द नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.24.04.2025 रोजी 22.15 वा.सु.शासकीय रुगणालय पाठीमागे स्मशानभुमी जवळुन गोवंशीय जातीचे 3 गायी एकुण 60,000₹ किंमतीचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या घेवून जात असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(अ), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-माहिलंब संतराम वाघमोडे, वय 45 वर्षे, रा. भगतवाडी ता.उमरगा जि. धाराशि,धनराज किसन दुधभाते, वय 44 वर्षे, रा. जुनी पेठ उमरगाता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.23.04.2025 रोजी 21.20ते 21.25 वा. सु.आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 25एए 4046 व मोटरसायकल क्र एमएच 24 एस 3807 हे जिल्हा परिषद मेन रोड उमरगा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ सार्वजनिक रोडवर व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विकास अशोक सरपे, वय 34 वर्षे, रा. भिमनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.4.2025 रोजी 21.00 वा सार्वजनिक रोडवर भिमनगर येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना उमरगा पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • तसेच आरोपी नामे-सुधीर प्रकाश सरपे, वय 36 वर्षे, रा. भिमनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.04.2025 रोजी 21.00 वा.सु. सार्वजनिक रोडवर जिल्हा परिषद शाळेजवळ उमरगा येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना उमरगा पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-श्रीहरी पंढरी पायाळ, वय 43 वर्षे, रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांची हिरो स्प्लेंडर प्लास कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एफ. 3504 अंदाजे 20,000₹ किंमतीची ही दि. 23.04.2025 रोजी 11.00 ते 11.30 वा. सु. तहशील कार्यालय परिसर कळंब येथुन अज्ञात व्यक्तीनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्रीहरी पायाळ यांनी दि.24.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शरणबसु मल्लाण्णा पाटील, वय 33 वर्षे, रा. प्लॉट 98 सरवदे नगर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांची अंदाजे 30,000₹किंमतीची मोटरसायकल क्रं एमएच 13 बी.टी. 8417 ही दि.22.04.2025 रोजी 21.00 वा. सु. खंडोबा मंदीर समोरुन अंणदुर येथुन अज्ञात व्यक्तीनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरणबसु पाटील यांनी दि.24.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-विवेक नेताजी पेठे, वय 24 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 52,000₹ किंमतीची होंन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल ही दि. 24.04.2025 रोजी 02.30 ते04.00 वा. सु. ताकविकी येथील नासेरखॉ पठाण यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विवेक पेठे यांनी दि.24.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अनिकेत महादेव दुधे, कल्याण इंद्रजित कदम, अमोल सुधाकर तुळजापुरे जि. धाराशिव यांनी दि.26.02.2025 रोजी 19.00 वा. सु. मातोश्री हॉटेल बार्शी नाकाचे पाठीमागे धाराशिव येथे फिर्यादी नामे-अभिषेक बालाजी तुळजापुरे, वय 18 वर्षे, रा. भानसगाव पोस्ट सोनेगाव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिण्यासाठी पैसे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, टॉमीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिषेक तुळजापुरे यांनी दि.24.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(2),115(2), 352,3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-किरण उध्दव गिड्डे, राहुल किरण गिड्डे, रोहन किरण गिड्डे, अनिता किरण गिड्डे, सौदागर भिमराव गिड्डे,उत्तम नागनाथ गिड्डे सर्व रा.आरळी बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.04.2025 रोजी 09.00 ते 09.30 वा. सु. आरळी बु.येथे फिर्यादी नामे-अविनाश भास्कर सलगर, वय 22 वर्षे, रा. आरळी बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुझे वडीलांचे सांगण्यावरुन आम्हाला पावरप्लॅन्टचे कामावरुन काडून टाकले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन जखमी केली. तसेच फिर्यादीची आई, वडील व भाउ यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश सलगर यांनी दि.24.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),352, 351(2), 189(2) 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुरेश सुगावे, प्रदिप सुगावे, राहुल सुगावे, राम कमलाकर सुगावे प्रसाद राहुल सुगावे सर्व रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.04.2025 रोजी 14.30 वा. सु. माडज येथे फिर्यादी नामे-व्यंकट गोविंद सुगावे, वय 32 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु येथे कसा काय आला असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, कत्ती, लोखंडी पाईप,रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-व्यंकट सुगावे यांनी दि.24.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 191(3), 190,118(2), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे: मयत नामे-पंढरीनाथ रामचंद्र लांडगे, वय 70 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर सांजा ता. जि. धाराशिव दि.17.01.2025 रोजी 05.00 ते 05.30 वा.सु. व्हि.जे. शिंदे कॉलेजच्या अलिकडे अकॅडमी जवळ वरुडा रोड धाराशिव येथे पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून पंढरीनाथ लांडगे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात पंढरीनाथ लांडगे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजितकुमार पंढरीनाथ लांडगे, वय 32 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर सांजा ता. जि. धाराशिव यांनी दि.24.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(बी), 106(2) सह 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे: मयत -अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्षे यास दि. 23.4.2025 रोजी 21.36 वा. सु. चोराखळी शिवारातील जय मल्हार हॉटेल जवह येरमाळा ते धाराशिव जाणारे एनएच 52 रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्षे यास धडक दिली. या अपघातात नमुद अनोळखी इसम हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मयुर राजकुमार बेले, पोलीस अंमलदार नेमणुक येरमाळा पोलीस ठाणे यांनी दि.24.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(बी), 106(1),(2) सह 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!