हिंगणगाव (परमेश्वर खडबडे) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी हिंगणगाव ता.कळंब येथे जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात व अभिमानाने भिम जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका मयुरी खाडे (हायातनगर, वसमत) यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच गावातील लहान मुले व मुलींनी नृत्य,गाणी,भाषणे अशा विविध कला सादर करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कला सादर करणाऱ्या सर्व मुलांना जयंती समितीच्या वतीने वही आणि पेन भेट देण्यात आले. गायिका मयुरी खाडे यांचे स्वागत शिवगंगा सुरवशे व सुशिला आवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी खालील कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. अध्यक्ष प्रशांत दहिरे,उपाध्यक्ष माणिक ढगे,सचिव विकास आवाड,खजिनदार सोमनाथ आवाड,प्रमुख भिम सैनिक बाळासाहेब आवाड,गिरीधर वाघमारे,नामदेव आवाड,प्रवीण आवाड,व्यंकट आवाड,धनराज आवाड,भाऊ आवाड,अजय आवाड. संपूर्ण कार्यक्रम गावातील सर्व भिम सैनिक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”