धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये “गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार” आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेबाबत जनजागृती व अंमलबजावणीसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळांमध्ये संबंधित तालुक्यांतील ग्रामसेवक व सरपंच यांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. परंडा तहसील कार्यालय येथे झालेल्या कार्यशाळेत तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी मोहन राऊत,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,उपविभागीय जलसंधारण अधिकारी टी.पी.हनवते,जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार जैन,सचिव जयघोष जैन,राज्य समन्वयक अशोक पवार व तालुका अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल उपस्थित होते. त्याचप्रमाणे भुम,लोहारा,उमरगा व तुळजापूर येथेही अशाच कार्यशाळा घेण्यात आल्या.भुम येथे तहसीलदार जयंतराव पाटील,लोहारा येथे रणजित कोळेकर, उमरगा येथे गोविंद येरमे तर तुळजापूर येथे पंचायत समिती सभागृहात ही कार्यशाळा झाली.सर्व कार्यशाळांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी योजनेची रूपरेषा मांडली. उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर.के.काळे,बी.एम.बसपुरे व सायली जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.जैन संघटनेचे समन्वयक अशोक पवार यांनी योजनेच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण,शिवार क्षेत्राचे पुनरुज्जीवन व शाश्वत शेतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन