June 20, 2025

डॉ.जयवंत शिवाजीराव ढोले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता

  • कळंब (अरविंद शिंदे) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्राणीशास्र विभागाचे प्रा.डॉ. जयवंत शिवाजीराव ढोले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) कठोर निकषांअंतर्गत अनेक प्राध्यापक अपात्र ठरल्यामुळे ही मान्यता विशेष सन्मानाची ठरली आहे.
  • डॉ.ढोले यांनी जलचर प्रजातींच्या निरीक्षण प्रणालीवर केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाला आहे.त्यांचे ३५ पेक्षा अधिक संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.तसेच,इंटरनॅशनल कमिशन ऑफ झूलॉजिकल नॉमेन्क्लेचर (ICZN) या जागतिक संस्थेने त्यांनी शोधलेल्या चार नव्या परोपजीवी प्रजातींची अधिकृत नोंद झू बँकेत केल्याने त्यांच्या संशोधनाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.डॉ.ढोले यांची विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिल्यामुळे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,प्रा.डॉ.राम चव्हाण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!