June 21, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त हजारो भीमसैनिकांचे अभिवादन

  • कळंब – कळंब शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण होते. शहरातील बालोद्यान येथील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम सैनिकांची सकाळपासून गर्दी होती. ध्वजारोहण,बुद्ध वंदना आदी कार्यक्रम घेण्यात आले.यानंतर मान्यवरांनी बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तर शहरातील चौका,चौकात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून खाऊ वाटप,व अल्पोहाराची सोय करण्यात आली होती.
    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुतळा परिसरात लाडू वाटप करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.तसेच महामानवाच्या प्रतिमेच्या मिरवणूकीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,मर्दानी खेळ लहान मुला मुलींनी सुंदर नृत्य सादर केले,मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली.बालोद्यान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले.यामध्ये तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील,माजी आमदार दयानंद गायकवाड,अजित पिंगळे,सतपाल बनसोडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे,चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी,भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य मकरंद पाटील,जिल्हा संघटक शिवाजी गिड्डे ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विश्वस्त सुनील गायकवाड,शिवसेना शहर अध्यक्ष शितल चोंदे,अनिल यादव,संतोष भांडे,रफिक सय्यद ,माणिक बोंदर,अरूण चौधरी,ऋषिकेश दशरथ,बाळासाहेब हौसलमल यांचा समावेश होता.
error: Content is protected !!