June 22, 2025

सरपंच पदाचा आरक्षण सोडतीचा फैसला जाहीर

  • कळंब – कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले,नायब तहसीलदार सांगळे,सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीनिवास शिंदे, निवडणूक कर्मचारी पाचभाई आप्पा,गपाट,खलील यांच्यासह तालुक्यातील सरपंच,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील आरक्षणाचा कार्यक्रम २०११ च्या जनगणनेनुसार संपन्न झाला. यावेळी आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या.
    अनुसूचित जातीसाठी – पिंप्री (शि,डिकसळ,जायफळ,वडगाव (शि),भाटशिरपुरा,सापनाई, सातेफळ,गौर,वाकडी के.तर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिलेसाठी – शिंगोली,पाथर्डी, देवळाली,कन्हेरवाडी,जवळा खुर्द,आवाड शिरपूरा,कोथळा, मंगरूळ,बाभळगाव
    अनुसूचित जमातीसाठी – नागूलगाव
    अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी – घारगाव
    सर्वसाधारण महिला – रांजणी, पाडोळी,चोराखळी,उपळाई, हावरगाव,दाभा,खोंदला, गंभिरवाडी,बांगरवाडी, कोठाळवाडी,बोरवंटी,लासरा, वाणेवाडी,उमरा/परतापूर, गोविंदपूर,गौरगाव,खामसवाडी, लोहटा पूर्व,मस्सा ख, तांदुळवाडी,पिंपळगाव को, खेर्डा,अंदोरा,बारातेवाडी
    सर्वसाधारण प्रवर्गासाठी – ईटकुर,ढोराळा,एकुरका, ताडगाव,पिंपळगाव डोळा, आढाळा,सात्रा,भोगजी, रायगाव्हन,बहुला,आथर्डी, बरमाचीवाडी,वाकडी ई., बोरगाव ध.,हिंगणगाव, करंजकल्ला,लोहटा पश्चिम, मोहा,नागझरवाडी,शिराढोण, वाघोली,सौंदना आंबा
    ओबीसी प्रवर्गासाठी – वाठवडा, येरमाळा,शेलगाव दि,भोसा, आडसूळवाडी,दुधाळवाडी, हासेगाव शि,देवधानोरा,सौंदना ढोकी/एरंडगाव, हासेगाव केज, खडकी, दहिफळ
    ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी –
    नायगाव,मलकापूर/संजितपूर, हाळदगाव,शेलगाव (ज),पानगाव,माळकरंजा, शेळका धानोरा,रत्नापूर, भाटसांगवी, वडगाव ज,बोरगाव बु, निपाणी,बोरगाव खुर्द
error: Content is protected !!