कळंब (माधवसिंग राजपूत) – कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्यावतीने आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कॅनरा बँकेच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले असून या बँकेच्या (पीओ )या पदासाठी निवड झाली.याबद्दल प्रसेनजीत शीलवंत याचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ,माधवसिंग राजपूत,माजी उपनगराध्यक्ष इंद्रजीत गायकवाड यांनी या यशाबद्दल कौतुक केले व अभिनंदन केले.यानंतर सत्कारमूर्ती प्रसेनजीत शीलवंत यांनी आपल्या मनोगतात शालेय शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षा यासाठीच्या अभ्यासास घरातून पाठबळ मिळाले याच्या बळावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व अपेक्षित व निवडलेल्या क्षेत्रात कॅनरा बँकेत (पीओ ) प्रोफेशनल ऑफिसर या पदी निवड झाली आहे.यासाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाले आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती निमित्त प्रसेनजीत शीलवंत याचा सत्कार झाला आहे. हा एक चांगला योग आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत अभ्यास व विषम परिस्थिती विरुद्ध संघर्ष करून जगामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते.
यासाठी कष्ट करण्याची तयारी व सकारात्मक विचार असावेत असे सांगितले.या कार्यक्रमात प्रसन्नजीत शीलवंत यांचे वडील मधुकर शीलवंत,खेर्डा गावचे माजी सरपंच विकास (आप्पा ) भंडारे,सतीश तवले,सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ जाधव,संत ज्ञानेश्वर बालक आश्रमाच्या संचालिका सरस्वती अडसूळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे यांनी केले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे