September 20, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर, कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा )– कळंब येथील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत १४ एप्रिल २०२५ रोजी महामानव,संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
    कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!