धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.09 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 141 कारवाया करुन 1,34,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-अर्चना राजु माने, वय 42 वर्षे, रा. इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.09.04.2025 रोजी 20.30 वा. सु. इंदीरानगर येथे आपल्या राहत्या घराचे बाजूस अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.तर आरोपी नामे-नाणी जगन पवार, वय 52 वर्षे, रा. दुध डेअरीजवळ साठे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यादि.09.04.2025 रोजी 19.30 वा. सु. साठेनगर धाराशिव येथे आपल्या राहत्या घराचे बाजूस अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.09.04.2025 रोजी 17.55 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकच्या पाठीमागे भाजी माकेर्ट सुलभ शौचालय समोर छापा टाकला.यावेळी आरोपी नामे-भिमराव बळीराम देडे, वय 45 वर्षे, रा. काक्रंबा ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 17.55 वा.सु. तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकच्या पाठीमागे भाजी माकेर्ट सुलभ शौचालय समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.09.04.2025 रोजी 17.30 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत प्रभात हॉटेलच्या पाठीमागे उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुनिल सुरेश शिंदे, वय 27 वर्षे, रा. नदीहत्तरगा ता. निलंगा जि. लातुर, महादेव शिवराम सगर, वय 43 वर्षे, रा. मात्रे प्लॉट उमरगा ता. उमरगा, भिमा भिमसु पवार, रा. बालाजी नगर उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा.सु.प्रभात हॉअेलच्या पाठीमागे उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 10,600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-जाकीर अमीनोद्दीन तांबोळी, वय 40 वर्षे,रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव, युवराज तुकाराम सिरसट, वय 35 वर्षे, रा. उपळा मा. ता. जि. धाराशिव, शाहरुख नौशाद शेख, वय 32 वर्षे, रा. रसुलपुरा रोड ता. जि. धाराशिव,संतोष लिंबाजी राठोड, वय 46 वर्षे, रा.जहागीरदावाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.09.04.2025 रोजी 11.05ते 11.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे रिक्षा क्र एमएच 25 एके 2125, रिक्षा क्र एमएच 25 ए.के. 0250, रिक्षा क्र एमएच 25 बी 5607, रिक्षा क्र एमएच 25 बी 5668 ही वाहने बसस्थानक गेटच्या समोर ते तुळजाभवानी कॉम्पलेक्स समोर धाराशिव येथे सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दत्तात्रय श्रीराम तनपुरे, वय 39 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंन्डर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 12 एफ.क्यु. 8256 ही दि. 07.04.2025 रोजी 15.00 ते 17.30 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कळंब येथील देशी दारुच्या दुकानासमोर कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय तनपुरे यांनी दि.09.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सोमनाथ नरसिंग मोरे, वय 51 वर्षे, रा. हिपरग्गा रवा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि. 05.04.2025 रोजी 11.45 वा. सु.शेतातील उसास पाणी देत असतांना संशयीत आरोपी नामे- सागर ज्ञानोबा राठोड रा. हिपरग्गा रवा ता. लोहारा जि. धाराशिव व इतर दोन यांनी सोमनाथ मोरे यांचे शिवकरवाडी येथील शेतातुन पांढऱ्या रंगाचे 38 पाईप कास्ती कंपनीचे अंदाजे 15,960₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोमनाथ मोरे यांनी दि.09.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-महानंदा दत्तात्रय बोरगे, सागर उर्फ दादा दत्तात्रय बोरगे दोघे रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.07.04.2025 रोजी 17.00 वा. सु. जवळा खु. शिवारात शेतगट नं 359 मध्ये फिर्यादी नामे-रंगनाथ दत्तु पवार, वय 55 वर्षे, रा. जवळा खु. ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमचेवर केस का केली? असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंगनाथ पवार यांनी दि.09.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-अजित भुजंग गाढवे, मुद्रुका भुजंग गाढवे दोघे रा. वरुडा ता. जि. धाराशिव यांनी दि.07.04.2025 रोजी 01.30 वा. सु. वरुडा येथे फिर्यादी नामे-सचिन लिंबराज गाढवे, वय 24 वर्षे, रा. वरुडा ता. जि. धाराशिव व त्यांची आई यांना नमुद आरोपींनी बांध टोकरण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयता, लाकडी दांडुकाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सचिन गाढवे यांनी दि.09.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118 (2),118(1), 115(2), 296, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-संदीप शिंदे, चिक्कु शेंडगे, किरण कांबळे, तिघे रा. मातंगनगर तुळजापूर, अनुज कदम, अक्षय कदम दोघे रा. भिमनगर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.09.04.2025 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे फिर्यादी नामे-ओंकार भारत घोगरे, वय 24 वर्षे, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी हळदी कुंकवाचे दुकान लावण्याचे व कचरा टाकण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ओंकार घोगरे यांनी दि.09.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2),191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-वैजनाथ रामदास हगारे, रामदास महादेव हगारे, ज्ञानेश्वर रामदास हगारे, सुरजबाई रामदास हगारे,रोहीनी वैजनाथ हगारे सर्व रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.08.04.2025 रोजी 17.30 वा. सु. आढाळा येथे फिर्यादी नामे-बाजीराव सुधाकर हगारे, वय 27 वर्षे, रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी लोखंडी सळई रोडवर टाकण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले तसेच फिर्यादीच्या आई या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी व फिर्यादीचे आईला पिकअपखाली घालतो व तुम्हाला चिरडुन जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाजीराव हगारे यांनी दि.09.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 352, 351(2), 189(2),191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-माधव कल्याण शिंदे, बालाजी प्रदीप शिंदे, अशोक अंगद अनभुले रा. चिंचपुर बु. ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.05.04.2025 रोजी 20.00 वा. सु. चिंचपुर ते लंगोटवाडी रस्त्यावर फिर्यादी नामे-महेश भागवत देवकर, वय 35 वर्षे, रा. चिंचपुर बु. ता. परंडा. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आम्हाला वाळु का काढू देत नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हायड्रोलि पाईप व हॉकी स्टीकने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश देवकर यांनी दि.09.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),281, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
वाशी पोलीस ठाणे: जखमी नामे- अतुल बाळकृष्ण भागवत, वय 31 वर्षे, व सोबत मयत नामे- अक्षय राम पाचंग्रे, वय 32 वर्षे, दोघे रा.खडकपुरा ता. जि बीड हे दोघे दि.05.04.2025 रोंजी 05.30वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 23 बी डी 9708 ही वरुन पारगाव शिवारातील मांजरा नदीच्या पुलाजवळून जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 23 ए.व्ही. 4979 चा चालक आरोपी नामे- अजिनाथ धुराजी नेवाळे, रा. ईमामपुर पाली ता. जि. बीड यानी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अतुल भागवत यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अक्षय पाचंग्रे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अतुल भागवत हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपक राम पाचंग्रे, वय 29 वर्षे, रा. खडकपुरा पेठ बीड ता. जि. बीड यांनी दि.09.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125 (ब), 106 सह 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: मयत नामे- पमाबाई शिवाजी मोरे, वय 70 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव या दि.31.01.2025 रोंजी 10.00वा. सु. सरमकुंडी फाटा येथे एनएच 52 हायवे रोडवर रोउलगत उभा होत्या. दरम्यान स्वीप्ट डिझायर कार क्र एमएच 05 ए.जे.9299 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून पमाबाई मोरे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात पमाबाई मोरे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आदेश अभिमान मोटे, वय 35 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.09.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह 134, 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश