कळंब – भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या विद्यमाने ९ एप्रिल २०२५ रोजी जेलभरो आंदोलन व १ जुलै २०२५ भारत बंद करण्यात येणार आहे. अध्यक्ष वामन मेश्राम वेबविकास चौधरी पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लोकशाहीला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून धोका निर्माण झालेला आहे.विद्यमान सरकार ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येत आहे.त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे आनंद केले जात आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकण्याचा आणि मनुस्मृती लागू करण्याचा मानस आलेला आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना केली जात नाही आणि त्यांना जातीच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिले जात नाही. याच्या विरोधामध्ये त्याचबरोबर संसदीय लोकशाहीला धोका निर्माण केला जात आहे.त्याच्या विरोधामध्ये बोधगया बिहार येथील महाबोधि विहाराचे ब्राह्मणाकडून ब्राह्मणीकरण केले जात आहे आणि ब्राह्मणांनी अवैध कब्जा निर्माण केलेला आहे.त्याच्या विरोधामध्ये त्याचबरोबर सतत महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या बदनामीचे सत्र संघ प्रणित आरएसएस च्या विविध संघटनांच्या मार्फत महापुरुषाची बदनामी केली जात आहे.याच्या विरोधामध्ये हे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.त्याशिवाय १ जुलैला भारत बंद ही करण्यात येणार आहे.या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभा करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात देशव्यापी आंदोलनात सक्रिय पाठिंबा करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष यांनी उस्मानाबाद येथे चलो गाव की ओर जाती जोडू बहुजन समाज जोडून या अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या विविध ठिकाणी प्रचार पत्रकाचे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन वितरण पुणे (प्रोटॉन) कर्मचारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी.बी.धावारे यांनी केलेला आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,सा.साक्षी पावन ज्योत कार्यकारी संपादक अविनाश घोडके,वाघमारे,सुयोग गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले