कळंब – कळंब शहरातील दत्तनगर,तांबडे नगर वस्ती या भागात श्री सिद्धेश्वर महादेव नवीन मंदिराचे निर्माण कार्य श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व परिसरातील भक्तांच्या इच्छेनुसार करण्यात आले असून यासाठी भव्य मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.या नवीन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलश रोहन कार्य दिनांक २ एप्रिल रोजी करण्यात येत असून यासाठी श्री महादेव,नंदी,व मंदिर कलश यांची यांची भव्य मिरवणूक 31 मार्च रोजी काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ,मृदंग यांच्यासह भजनी मंडळ तसेच डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांचा सहभाग होता.ही मिरवणूक कळंब शहरातील प्रमुख मार्गावरून देवी मंदिर रोड, सराफा गल्ली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौक व पुढे येरमाळा रोडने तांबडे नगर येथे पोहचली. प्राण प्रतिष्ठापणा करण्याआधी या मूर्ती एक दिवस जल व दुसऱ्या दिवशी धान्य यामध्ये ठेवण्यात येत असून 2 एप्रिल रोजी भव्य व मंत्रोच्चारात मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलश रोहन कार्यक्रम संपन्न होत आहे. यासाठी आचार्य पुरोहित योगेश महाराज जोशी पारेकर व इतर ब्राह्मण वृंद,कलश रोहन दत्ता महाराज आंबीरकर डिकसळ, मूर्ती प्राणप्रतिष्ठा गजींदर बाबा मूर्तडकर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. सर्व कार्यक्रमाचे ज्ञानसिंधू गुरुवर्य संदीपान महाराज हासेगांवकर यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले आहे,तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. विश्वंभर (आप्पा ) पाटील यांनी केले आहे. मिरवणूक यशस्वीतेसाठी ह.भ.प .विश्वंभर (आप्पा) पाटील,महादेव महाराज अडसूळ,कमलाकर पाटील, अशोक चोंदे,मीराताई चोंदे, यांच्यासह भावी भक्तांचा सहभाग होता.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात