धाराशिव – नगरपालिका माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत घरवापसी केली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमच्या या शिलेदाराची दिशाभूल करून भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केले होते.प्रवेश करून घेताना सांगितलेल्या काही बाबी असत्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी शहरप्रमुख सोमनाथ गुरव,युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे,माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,पंकज पाटील, राहुल बनसोडे,प्रताप शेंडगे, रियाज भाई,आनंद बनसोडे,रवी कोरे,शाहबाज पठाण आदी उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान