August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.18 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 358 कारवाया करुन 3,02,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमोल विजय लोंढे, वय 30 वर्षे, रा. हंगरगा तुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.18.03.2025 रोजी 21.30 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर तुळजापूर येथे अंदाजे 560 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-आलीम सलीम अरब, वय 32 वर्षे, रा. समता नगर, परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.18.03.2025 रोजी 19.00 वा. सु. कुर्डुवाडी रोड समता नगर रोडच्या कडेला किराणा दुकानाच्या शेजारी आडोशाला परंडा येथे अंदाजे 2,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.18.03.2025 रोजी 13.00 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत राजुरी येथे जुनी चावडीच्या आडोशाला राजुरी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बाबा जनार्धन लुगडे, वय 65 वर्षे, रा. राजुरी ता. परंडा जि. धाराशिव हे 13.00 वा.सु. राजुरी येथे जुनी चावडीच्या आडेाशाला राजुरी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,210 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.18.03.2025 रोजी 15.30 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत येरमाळा शासकीय बंद गोदाम येथे टपरी समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-नागनाथ बाबुराव भागवते, वय 35 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 15.30 वा.सु. येरमाळा येथे शासकीय बंद गोदाम येथे टपरी समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 980 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-परमेश्वर विश्वनाथ विजापुरे, वय 54 वर्षे, रा. कुंभरी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर,धनराज किशोर खंडागळे, वय 26 वर्षे, रा. केशेगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी 18.15 ते 18.30 वा. सु. आपपल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा कंपनीचे व्ही 20 इंट्रा वाहन क्र एमएच 13 सीयु 7322 व छोटा हत्ती क्र एमएच 12 जेएफ 7803 ही वाहने बंडगर बेकरी समोर देशपांडे स्टॅण्ड धाराशिव येथे रोडवर व बोस्टन टी हॉटेलसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये धाराशिव शहर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशोक पंडीत कोठावळे, वय 45 वर्षे, रा. दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव, धनंजय प्रकाश शिंदे, वय 24 वर्षे, रा. केळेवाडी ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी 17.40 ते 18.00 वा. सु. आपपल्या ताब्यातील अनुक्रमे तीन चाकी पिॲगो अॅपे क्र एमएच 13 एक्स5677 व तीन चाकी पिॲगो ॲपे क्र एमएच 25 एम 1445 ही वाहने पारा चौक मांडवा रोडवर वाशी येथे व बाजार तळाजवळ तांदुळवाडी रोड वाशी येथे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • परंडा पोलीस ठाणे :दि. 01.01.2025 रोजी 12.30 ते दि. 15.03.2025 रोजी 13.00 वा.सु. आवारपिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारपिंपरी गावठाण जमिनीवरुन अज्ञात व्यक्तीने 10 ब्रास वाळु अंदाजे 6,000₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैभव हणुमंत नरुटे, वय 33 वर्षे, पोलीस पाटील रा. आवरपिंपरी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- महादेव उत्तमराव देशमुख, वय 55 वर्षे, रा. धामणगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांचा अंदाजे 2,00,000₹ किंमतीचा ट्रॅक्टर क्र एमतएच 13 डीवाय 7626 हा दि. 12.03.2025 रोजी 06.00 वा. सु. शेत गट नं 175 मध्ये असलेल्या पत्राच्या शेडसमोर खुंटेवाडी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव देशमुख यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :दि.20.02.2025 रोजी16.00 वा. पुर्वी मसला खुर्द येथील एअरटेल कंपनीचे इंडस टॉवर चे आयवन डिवाईस (कॅम्बीयम 300 ईपीएमपी बीटीएसएनडीयु) अंदाजे 30,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव पंडीत धवन, वय 40 वर्षे, व्य. खाजगी नोकरी रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे :दि.20.02.2025 रोजी 15.00 वा. पुर्वी मार्डी येथील मारुती जिंदा वाझमोडे यांचे शेतातील आडीक्र.ईन 1253073 असलेले ईडस टॉवर चे आयवन डिवाईस (कॅम्बीयम 300 ईपीएमपी बीटीएसएनडीयु) अंदाजे 60,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल काशीनाथ धवन, वय 37 वर्षे, व्य. खाजगी नोकरी रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदगनर पोलीस ठाणे :दि.13.03.2025 रोजी 19.00 वा. पुर्वी सांजा चौक धाराशिव येथील पाटील यांचे घरावरुन एअरटेल कंपनीचे इंडस टॉवर आयवान डिवाईस दोन नग (कॅम्बीयम 300 ईपीएमपी बीटीएसएनडीयु) अंदाजे 60,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव पंडीत धवन, वय 40 वर्षे, व्य. खाजगी नोकरी रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- रत्नदिप चव्हाण, पवन चव्हाण, अतुल चव्हाण, भाउ चव्हाण, उमेश शिंदे, अंकुश मेंढे सर्व रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 15.03.2025 रोजी 17.00 वा. सु.जि. प. शाळा वाल्हा येथे समोर रोडवर फिर्यादी नामे-शरद बाबासाहेब शेळवणे, वय 32 वर्षे, रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दत्ता शेळवणे यास का असे विचारण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गळा दाबून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, गज व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरद शेळवणे यांनी दि.18.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1),115, 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- निलेश अर्जुन शेळवणे, बालाजी संजय शेळवणे, जयसिंग ज्ञानराज चौघुले, राम नानासाहेब पवार, राहुल नारायण शेळवणे, अतुल नारायण शेळवणे, संस्कार उर्फ पांडुरंग गपाट, बालाजी जयराम शेळवणे सर्व रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 15.03.2025 रोजी 09.15 वा. सु.जिल्हा.परिषद.शाळा वाल्हा येथे समोर रोडवर फिर्यादी नामे-रत्नदिप शिवाजी चव्हाण, वय 38 वर्षे, रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना जिल्हा. परिषद. शाळा वाल्हा येथे समोर रोडवर पायी जात असताना नमुद आरोपींनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गळा दाबून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड व वायरुपने मारहाण करुन गंभीर जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रत्नदिप चव्हाण यांनी दि.18.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1),115, 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- सनी काळे, काका सावंत,अक्षय पाचकवडे, इम्रान शेख,शक्ती काळे,शरण काळे, सर्व रा. भुम ता.भुम जि.धाराशिव यांनी दि. 13.03.2025 रोजी 18.45 वा. सु.फ्लोरा चौक भुम येथे हॉटेलमध्ये फिर्यादी नामे-विशाल बाबासाहेब गरड, वय 24 वर्षे, रा. एम.एस.ई.बी. आूफीस समोर समर्थ नगर परंडा रोड भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पोलीस ठाणे भुम येथे तक्रारी अर्ज दिल्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवार, बिअर बॉटल, कोयता, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रत्नदिप चव्हाण यांनी दि.18.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1),115(2), 352, 351(3), 189(2), 189(4), 191(3), 190, 125 (अ), अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर),3(1)(एस), 3(2)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे- मधुकर देविदास जगताप, आकाश मधुकर जगताप, अभिजीत मधुकर जगताप, बाळु विक्रम जगताप सर्व रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 13.03.2025 रोजी 20.00 वा. सु.गोजवाडा मार्गे घोडकी चौक झिन्नर शिवार येथे फिर्यादी नामे-दत्तात्रय वसंत ओमन, वय 42 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गाडीवर ड्रायव्हर रहा या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व वायरने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय ओमन यांनी दि.18.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 191(3),118(1), 115(2),352, 351(2),351(3), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे-लक्ष्मण हणुमंत जाधवर, वय 32 वर्षे, रा. भोगजी, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 19.45 वा. सु. चोराखळी पाटीवर येरमाळा ते धाराशिव जाणारे रोडवरुन इको कार क्र एमएच 12 आरटी 1391 ने घोळवेवाडी येथे जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 बीए 5038 चा चालक आरोपी नामे- सुभाष अशोक मैंदाड, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून ट्रॅक्टर अचानक दुभाजकावर घालुन ट्रॅक्टरला पाठीमागे असलेल्या मळणीयंत्राने धडक दिली. या अपघातात लक्ष्मण जाधवर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. व कारचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कोमल लक्ष्मण जाधवर, वय 30 वर्षे, रा. भोगजी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(अ), 125(ब), 324 (4)(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे- बाबुराव लिंबाजी चव्हाण, वय 55 वर्षे, रा. ऐकंबी ता. औसा जि. लातुर हे दि.05.03.2025 रोजी 17.00 वा. सु. वरवंटी ते वडगाव सि. रोडवर सचिन दिनकर देशमुख यांचे शेत गट नं 117 जवळून मोटरसायकल क्र एमएच 13 डीजी 858 वरुन जात होते. मयत आरोपी नामे- बाबुराव चव्हाण यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल रोडच्या बाजूच्या खड्यात पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शांताबाई बाबुराव चव्हाण, वय 49 वर्षे, रा. ऐकंबी तांडा ता. औसा जि. लातुर यांनी दि.18.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ब), सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “टॉवरचे साहित्य चोरणारा उच्चशिक्षित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .”
  • दिनांक 17. 03. 2025 रोजी पोस्टे धाराशिव ग्रामीण गुर नं 65/2025 कलम 303 (2) भारतीय न्यायसंहिता अन्वये येडशी येथील इंडस टावर कंपनीच्या टावर क्रमांक 1069862 वर लावलेला एअरटेल कंपनीचा आय वेन डिवाइस डिश अँटेना अज्ञात चोरट्याने चोरून नेला. वगैरे फिर्यादी-जबावावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाप्रकारे टेलिकॉम कंपनीच्या टॉवर वरून इलेक्ट्रॉनिक उप करणे चोरीचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे दाखल झाले असुन
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साहेब यांचे आदेशावरून दिनांक 18. 03. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हे करणाऱ्या इसमा बाबत माहिती प्राप्त झाली. सदर बाबत सखोल तपास केला असता आंबेजोगाई तालुका जि. बीड येथील एका संशईत व्यक्तीचे नाव तपासात समोर आले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेजोगाई तालुका जि. बीड येथे तात्काळ जावून राजेश आचार्य नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. तसेच त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने तो यापूर्वी रिकाम कंपनीत इंजिनियर म्हणून कामास होता. तसेच नोकरी गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्याने धाराशिव जिल्ह्यातील येडशी सांजा मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्रावरच्या वर लावलेले इंटरनेटसाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण 300 हे स्वतःच्या फायद्या करता चोरी केले असल्याचे कबूल केले. नमुद आरोपीने एकूण सहा उपकरणे चोरली असल्याचे तपासातून समोर आले पोलिसांनी धाराशिव जिल्ह्याचे गुन्हे अभिलेखाची तपाणी केली असता नमुद आरोपीविरुध्द चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने नमुद आरोपीकडून एकूण 1,65,000 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,35,000₹ किंमतीचा माल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस मुद्देमालासह पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे पुढील कार्यवाही कामी हजर केले आहे.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी,चापोका -नितीन भोसले,चापोका- रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.
  • जनसंपर्क विभाग, धाराशिव पोलीस
error: Content is protected !!