हासेगाव – प्रेम,माया,वात्सल्य, शेती,पाणी,नाती,गोती अशा विषयाच्या अनुषंगाने काव्य संग्रहातील कवितेचा परामर्श घेणाऱ्या ग्रामीण भागातील नाती गोती याचं महत्त्व सांगणाऱ्या या ओव्या आणि कविता संग्रहातील कविता आपल्या ग्रामीण भागातील माणसांच्या मनावरती नक्की प्रतिबिंबित होत असलेल्या कवयीत्री सरुबाई डोके यांच्या “जातीवरील ओव्या” आणि भूमिपुत्र वाघ यांचा काव्य संग्रह “आभाळमाया” संग्रहाचे प्रकाशन दि.२३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पर्याय संस्था,रामदास वाजे सांस्कृतिक सभागृह कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विश्वनाथ (अण्णा) तोडकर,प्राचार्य अनिगुंठे, रमाकांत कुलकर्णी,एम.एन. कोंढाळकर, माजी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर,भास्कर चंदनशिव,प्राचार्य गोविंद बिराजदार,अशोक शिंदे,अमर चौंदे,परमेश्वर पालकर,बालाजी अडसूळ,प्रो.बाळकृष्ण भवर,पत्रकार सतीश टोणगे, सुभाष घोडके अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कळंब या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे.
परिसरातील कथाकार,कवी यांना खास निमंत्रित करण्यात आले असून काव्य संमेलनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ, संपादिका अमिता पैठणकर,कवी महादेव गपाट,अश्रुबा कोठावळे, एडवोकेट दिलीप कांबळे,प्रो. मनीषा कदम (खोबरे), धनंजय घोगरे,प्राचार्य जगदीश गवळी,के.व्ही.सरवदे, प्रा.शेखर गिरी,ओमप्रकाश गिरी, समाजसेविका अनिता तोडकर,मनीषा घुले,शिवमती विजया वाघ, विलास मुळीक,महवीर डोके,सोबत, महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य उत्तरदायित्व या स्वयंसेवी नेटवर्कचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आणि येण्यासाठी आव्हान भूमिपुत्र वाघ यांनी केले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर