February 10, 2026

राजेंद्र बारगुले यांची “सा.साक्षी पावन ज्योत” कळंब शहर विशेष प्रतिनिधीपदी नियुक्ती

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावन ज्योत या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या विशेष प्रतिनिधीपदी राजेंद्र बारगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीच्या निमित्ताने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांच्या हस्ते त्यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांनी त्यांचे मनस्वी अभिनंदन केले आहे.
    यावेळी कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड व विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी राजेंद्र बारगुले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    राजेंद्र बारगुले यांना या नवीन जबाबदारीतून स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी व जनसामान्यांचे प्रश्न प्रकाशझोतात आणण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या वाटचालीला सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!