कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावन ज्योत या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या कळंब शहरातील बाबानगर प्रतिनिधीपदी शिवराज पौळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांच्या हस्ते त्यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य संपादक सुभाष द.घोडके व कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी शिवराज पौळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कार्यकुशलतेने आणि निःपक्ष वृत्तांकनाने स्थानिक पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिवराज पौळ यांना सा.साक्षी पावन ज्योत च्या माध्यमातून सामाजिक प्रश्न,स्थानिक घडामोडी आणि नागरिकांच्या समस्या प्रकाशझोतात आणण्याची संधी मिळणार आहे.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी