June 22, 2025

तुषार शिंदेचा भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल

  • धाराशिव – धाराशिव मजूर फेडरेशनच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून,भाजपाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून कळंब तालुक्यातील मौजे लोहटा (पूर्व) येथील तुषार शिंदे यांचा तर कळंब तालुक्यातून खुल्या प्रवर्गातून वैभव उमाकांत मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
    या बाबत सविस्तर वृत्त असे की, मजूर फेडरेशनच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे.दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी उद्या होणार आहे.तर अंतिम उमेदवारांची यादी दि.११ मार्चला कार्यालयाबाहेर डकवली जाणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि.२५ मार्च पर्यंत अवधी राहणार आहे.
    तुषार शिंदे यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील यांचे विश्वासू मानले जात होते.१९९७ मध्ये त्यांनी मंगरूळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून जिंकली होती. तर २००२ मध्ये डिकसळ जिल्हा परिषद गटातून पुन्हा निवडणूक लढवून ते विजयी झाले होते.त्यावेळी त्यांची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती निवड करण्यात आली होती.या पदाचा कार्यभारही त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे सांगितले जाते. वडीलांचा राजकीय वारसा असलेले तुषार शिंदे हे उच्च शिक्षीत आहेत.अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे.तसेच मातोश्री रमाबाई मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत.विशेष करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक म्हणूनही त्यांची सर्वत्र ओळख आहे.
    उमेदवारी अर्ज दाखल करताना कळंब तालुक्यातील भाजपचे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, डीसीसीचे माजी चेअरमन पंडीतराव टेकाळे,माजी उपसभापती विकास बारकुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण चौधरी, करंजकल्ल्याचे माजी सरपंच विशाल पवार,लोहटा (पूर्व) माजी सरपंच मेघराज देशमुख,माजी सदस्य विशाल शिंदे,संदीप मोरे, उत्तम टेकाळे,सेवानिवृत्त सहा. निबंधक श्याम गायकवाड,मनोज साळुंखे,युवराज आल्टे, गणेश बोंदर यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
error: Content is protected !!